लोकमत


बंजारा एकता संकल्प यात्रेचे यवतमाळमध्ये जोरदार स्वागत

सेवागड ते नवी दिल्ली ऐतिहासिक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : सेवागड (आंध्र प्रदेश) ते नवी दिल्ली या ऐतिहासिक प्रवासाला निघालेल्या बंजारा एकता संकल्प यात्रेचे यवतमाळ शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. संत सेवालाल महाराज मंदिर, राजीवनगर परिसरात उपस्थित समाजबांधवांनी 'जय सेवालाल, जय लख्खीशाह बंजारा, जय रामराव महाराज' आदी घोषणांनी आणि पांढऱ्या ध्वजांनी परिसर दुमदुमून निघाला.

श्री संत सेवालाल महाराज चॅरिटेबल ट्रस्ट गुत्ती (बेल्लारी) यांच्या पुढाकाराने निघालेली ही राष्ट्रव्यापी जनजागृती यात्रा समाजात एकता, शिक्षण, सामाजिक सुधारणा तसेच स्वाभिमान या मूल्यांची जागृती करण्यासाठी आहे. यात्रेच्या माध्यमातून बंजारा समाजाला एकत्र आणून समाजहिताच्या प्रश्नांवर जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. यात्रेचे नेतृत्व श्री महाराज (मुख्य पुजारी) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून ट्रस्टचे अध्यक्ष जगन्नाधा राव (आयपीएस), उपाध्यक्ष एस. के. केशवा नाईक, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पी.एल. रवींद्र नाईक, सरचिटणीस अश्वत्था नाईक, कोषाध्यक्ष एस.सी. बाला नाईक, संघटन सचिव डॉ. श्रीरामलु नाईक, एस. के. रामचंद्र नाईक, तसेच संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डी. रामानायक यांची यात्रेत प्रमुख उपस्थिती आहे. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड व प्रा. ठाकुरदास चव्हाण हे पोहरादेवी ते यवतमाळ यात्रेत सहभागी झालेत. यात्रेनंतर डॉ. टी.सी. राठोड यांच्या निवासस्थानी सभेत रूपांतर झाले. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन धूपचंद राठोड, तर आभार यात्रा संयोजक संतोष यांनी मानले. आयोजनासाठी बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एन. टी. जाधव, भरत राठोड यांच्या मार्गदर्शनात प्रा. डी. एस. चव्हाण, डॉ. सुभाष जाधव, दिनेश राठोड, प्रेमदास राठोड, संतोष पवार, देविदास राठोड, प्रा. राहुल चव्हाण, रवी चव्हाण, संत सेवालाल महाराज ट्रस्टचे विश्वस्त गणेश चव्हाण, संतोष शेंडे, पवन तिवारी आदींनी पुढाकार घेतला.

यात्रा प्रेरणादायी : टी. सी. राठोड यांचे प्रतिपादन

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांनी या सभेत मार्गदर्शन केले. समाजासमोर विविध प्रश्न उभे आहेत. अशावेळी संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. बंजारा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी समाजातील प्रत्येकाने सक्रिय योगदान द्यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. समाजाच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि भावी पिढीपर्यंत त्याचे संवर्धन करण्यासाठी ही यात्रा प्रेरणादायी ठरत असल्याचे डॉ. टी.सी. राठोड म्हणाले.

(ग्राफीक्समधील मजकूर)

यात्रेचे शिस्तबद्ध नियोजन असून सहभागींची दर्जेदार व्यवस्था आयोजकांनी केली होती